सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच घेतली चाळीस हजार रुपयांची खंडणी

Police took a ransom of Rs 40,000
पुणे शहर पोलीस दलात सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने गुन्ह्यात न अडकविण्यासाठी खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात हा प्रकार घडला असून, संबंधित अधिकारी गणवेशात सातारा जिल्ह्यात गेले आणि त्यांना गुन्ह्यात अकविण्याची धमकी देऊन 40 हजार रुपयांची खंडणी घेऊन पुण्यात आले आहेत. दरम्यान पुणे पोलीसांनी प्रकरणाचा अहवाल शासनास सादर केला असून लवकरच निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

No comments