लोकमाता अहिल्यादेवी यांची जयंती घरीच साजरी करा : आमदार गोपीचंद पडळकर

यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीमुळे,३१ मे रोजी लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती आपण सर्वजण घरीच राहून साजरी करूया असे आवाहन विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सर्वांना केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी होत असणारा सोहळा हा कोरोना वायरस मुळे रद्द करण्यात आलेला असून त्याठिकाणी कोणीही गर्दी करू नये असे आवाहन पडळकर यांनी केले.
त्याऐवजी आपण सकाळी आठ ते नऊ या वेळेत घरीच अहिल्यादेवींचा फोटो ठेवून त्याचे पूजन करावे व ते फोटो सोशल मीडियामध्ये वायरल करावेत आणि त्यातून सर्वांचा उत्साह वाढवावा असं आवाहन आमदार पडळकर यांनी केले.
No comments