गुडन्यूज । आजपासून बोकडाचे मटण झाले स्वस्त, लॉकडाऊन स्पेशल ऑफर

Mutton price became cheaper


कोरोना नि लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसांड सुरू आहे. यातच मटणाचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आता हेच मटण स्वस्त झाले आहे. 
वेळापूर, ता. माळशिरस येथे सर्व मटण विक्रेत्यांनी एकत्र येत लॉक डाऊन स्पेशल ऑफर सुरू केली असून यामध्ये ठराविक कालावधी साठी 500 रुपये किलो प्रमाणे स्वच्छ व ताजे बोकडाचे मटण ग्राहकांना देण्यात येणार आहे. ही ऑफर ठराविक कालावधी साठी लागू करण्यात आली असली तरी सर्वसामान्य नागरिकांना आनंद देणारी ठरणार आहे. 

No comments