कोळेगाव । दोन गटात जबर मारहाण, गुन्हा दाखल । अवैध शस्त्रे बाळगणारी टोळी पोलिसांच्या जाळयात

कोळेगाव, ता. माळशिरस येथे दोन गटात जबर मारहाण झाली असून याबाबत वेळापूर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच या भांडणात एका बाजूने जाऊन पुन्हा भांडण करण्यासाठी जात असणाऱ्या पैलवानांना वेळापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या टोळीकडे धारदार शस्त्रे सापडली असून याबाबत ही वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
याबाबत बाळासो रघुनाथ जाधव व युवराज उत्तम माने यांनी एकमेकांविरुद्ध वेळापूर पोलिसांत फिर्याद दिल्या आहेत. यामध्ये बाळासो जाधव यांचे फिर्यादीनुसार उद्धव माने, युवराज माने, विकास माने, पांडुरंग माने, सुदर्शन माने, अनिल लामकाने, सोपान दुपडे, योगेश दुपडे, मंगेश दुपडे, दत्तात्रय माने, नितीन माने, पृथ्वीराज सावंत, राहुल सावंत, दत्तात्रय लामकाने, सचिन माने व इतर दोन ते तीन जणांविरुद्ध लोखंडी रॉड, काठी, लाथा बुक्कानी जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर युवराज माने यांचे फिर्यादीनुसार बाळू जाधव, हनुमंत जाधव, नाना जाधव, आप्पासाहेब जाधव, धनाजी जाधव, रामचंद्र जाधव, सचिन जाधव, विकास जाधव, विलास करांडे, दत्तात्रय माने यांच्याविरोधात धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करणेत आला आहे.
यामध्ये युवराज माने याचे बाजूने परत भांडण करण्यासाठी जाणारे 1 ) महादेव बाळासाहेब कोरके वय -23 वर्षे 2 ) ज्ञानेश्वर पवार वय -22 वर्षे 3 ) सुनिल गोरख बनाकर वय -21 4 ) विकास विठठल काटवटे वय -21 वर्षे 5 ) ज्ञानेश्वर नामदेव काटवटे वय -21 वर्षे सर्व रा.करकंब ता . पंढरपूर 6 ) सागर किसन जाधव यय 22 वर्षे ( चालक ) . 7 ) मिथून दशरथ साळुखे व्य -20 वर्षे दोघे रा . अरण ता.माढा 8 ) प्रमोद मच्छिंद्र खटके वय -22 वर्षे वा गोटी ता.इंदापूर जि . पुणे 9 ) निखील बाळू चव्हाण वय -25 वर्ष रा . वेळापूर ता.माळशिरस यांचेकडे बेकायदेशीर धारदार घातक शस्त्रे बाळगून स्कॉर्पिओ जीप नं . MH - 12 / MB - 90 मधून कोळेगांव येथे भाडण करणेसाठी निघाले असतांना पोलिसांना मिळून आले आहेत . म्हणून पोकॉ थिटे यांनी त्यांचेविरूध्द भा.द.वि.क 143 , आर्म अक्ट कलम 4 ( 25 ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
No comments