सोलापूरातील सुरु असलेल्या दवाखान्यांच्या माहितीसाठी जिल्हा कोविड नियंत्रण कक्षास संपर्क करा
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर शहरातील सुरू असलेल्या खाजगी दवाखान्यांची माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 18002335044 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावानंतर सोलापूर शहरातील खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवर ताण येत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरू ठेवावे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी वारंवार चर्चा केली आहे. मात्र मात्र खाजगी दवाखान्यातून रुग्ण सेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारी लक्षात घेता इंडियन मेडीकल असोसिएशनला खाजगी दवाखाने सुरू ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची कोणते दवाखाने सुरू आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी, अशी सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनने शहरात सुरू असलेल्या दवाखान्यांची यादी जिल्हा प्रशासनास सादर केली होती ही यादी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध असून नागरिकांना कोणते दवाखाने सुरू आहे याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातून मिळू शकेल. तसेच सदर दवाखाने बंद असल्यास अथवा रुग्णसेवा मिळत नसल्यास नागरिकांनी जिल्हा कोविड कक्षास संपर्क साधून कोणत्या दवाखान्यात कोणती रुग्णसेवा मिळाली नाही याचा तपशील द्यावा जेणेकरून पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे.
No comments