दादासाहेब काळे यांचे निधन

माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य व पिसेवाडी येथील प्रगतशिल बागाईतदार दादासाहेब काळे यांचे शनिवारी सायंकाळी ७ वाजता पुण्यात हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले . ते ५५ वर्षाचे होते .
काळे यांना छातीत जास्त दुखायला लागल्याने गुरुवारी पुणा हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणण्यात आले होते . त्यांच्यावर उपचार चालू असताना शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , एक मुलगी , आई , वडील असा परिवार आहे . त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

No comments