वेळापूर मध्ये गटारांची दुर्वस्था

वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर

वेळापूर येथील व्यापारी पेठेतून जुन्या बाजार तळावरती जाणाऱ्या रोडजवळील गटार गेले एक महिन्यापासून उघडे पडले आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे प्रमाण वाढले आहे नि त्यातच वेळापूर व परिसरात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लवकरात लवकर या गटारीची स्वछता करून गटार झाकून घेण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वेळापूर ग्रामपंचायत प्रशासनाने वेळापूर गावातील रोड सिमेंट काँक्रेटचे केले त्यासोबतच घाणीचे प्रमाण कमी करण्यासाठी गटारीही झाकून घेतल्या होत्या मात्र या रोडजवळील गटार गेल्या महिन्यात उघडी पडली होती नि त्यातच या परिसरातील घरांमधील पाणी व कचरा अडकून या परिसराची अवस्था वाईट झाली आहे गेल्या आठवड्यापासून या गटारीमुळे या परिसरात प्रचंड अशी दुर्गंधी झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या गटारीची स्वछता करून लवकरात लवकर गटार झाकून घेण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
★★★★★★★★★★

वेळापूर लाइव्ह टीम
वाचत राहा : www.velapurlive.blogspot.in
फेसबुक पेज लाइक करा : www.facebook.com/velapurlive

No comments