खुडूसमध्ये कडकडीत बंद
वेळापूर लाइव्ह टीम । खुडूस
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे शनिवार ता १० रोजी अज्ञात समाज कंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्त खुडूस मध्ये शनिवार ता. १० रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. समाज बांधवानी केलेल्या खुडूस बंद आवाहनाला गावकर्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
No comments