आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धा, बक्षीस वितरण वेळापूर
वेळापूर ता. ३
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व वेळापूर पोलीस ठाणे व वेळापूर पत्रकार संघ आयोजित आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०१५ चा पारितोषिक वितरण समारंभ वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर ट्रस्टचे भक्त निवास येथे पार पडला.
यामध्ये ग्रामीण विभागात शिवतीर्थ गणेशोत्सव मंडळ मळोली यांनी तृतीय, स्वाभिमानी गणेशोत्सव मंडळ शेरी नं. २ वेळापूर द्वितीय, शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ निमगाव (म) प्रथम तर शहरी विभागात श्री क्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ वेळापूर प्रथम, डॉ. भाईनाथ महाराज गणेशोत्सव मंडळ भाईनाथ नगर वेळापूर द्वितीय तर सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ वेळापूर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
यावेळी अकलूज विभागाचे उप अधीक्षक तिरुपती काकडे, वेळापूरचे ए.पी.आय. विजय यादव, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब धांइंजे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बनसोडे, अर्धनारी नटेश्वर देवालय ट्रस्टचे अमृतराज माने देशमुख, वेळापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड.आडत, सूर्यकांत भिसे, महादेव जाधव, धनंजय पवार, श्रीनिवास कदम पाटील, ओंकार आडत आदी उपस्थित होते.
No comments