Lockdown मध्ये 1.75 लाख रुपयाची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह महिला अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
कोरची येथील 55 वर्षीय तक्रारदार यांनी याप्रकरणी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांना सर्व्हे क्रमांक 1 ते 11 मधील मालाच्या चौकशीत शिथीलता देण्यासाठी वडसा वन विभागातील फिरते पथकातील (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर कोरेवार व कोरची तालुक्यातील बेडगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा उईके यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तडजोडीत 1 लाख 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाचेची ठरलेली रक्कम प्रेरणा उईके यांच्यामार्फत स्विकारण्यात आली. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
No comments