शाळा कधी सुरू होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली तारीख

When will school start?  Date announced by Deputy Chief Minister Ajit Pawar
शाळेचे संग्रहित छायाचित्र । सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा. 
शाळा कधी सुरू होणार? शाळा कशा भरणार?असे अनेक प्रश्न मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडले असताना त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन राज्यातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.
या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.


No comments