चीननं तयार केली ‘कोरोना’ व्हायरसवर लस? 10 कोटी डोस होणार तयार

China develops vaccine against corona virus?  10 crore doses will be ready
चीनी संशोधकांनी कोरोना व्हायरसवर 99 टक्के प्रभावी वॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. या वॅक्सीनचे सुमारे 10 करोड डोस बनवण्याची तयारी सुरू आहे. बिजिंगची बायोटेक कंपनी सिनोवॅकने ही वॅक्सीन तयार केली आहे. चीनमध्ये सुमारे एक हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांवर याची ट्रायल सुरू आहे. आता या वॅक्सीनची स्टेज 3 ट्रायल ब्रिटनमध्ये करण्याची तयारी केली जात आहे.


वॅक्सीन बनवणार्‍या संशोधकांना जेव्हा विचारण्यात आले की, ही वॅक्सीन किती प्रभावी आहे, तेव्हा संशोधनक लुओ बॅशन यांनी म्हटले की, हे औषध 99 टक्के प्रभावी ठरणार आहे. सध्या कंपनी वॅक्सीनची स्टेज 3 ट्रायल करत आहे, परंतु चीनमध्ये कोरोनाचे रूग्ण कमी असल्याने स्वयंसेवकांची संख्या कमी पडत आहे.

यानंतर संशोधनकांनी ट्रायल युरोपमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सिनोवॅकने म्हटले की, आम्ही युरोपच्या अनेक देशांशी ट्रायलसाठी चर्चा करत आहोत. यासोबतच युकेशी सुद्धा चर्चा सुरू आहे. ही चर्चा पहिल्या टप्प्यात आहे. कंपनी बिजिंग प्लांटमध्ये सुमारे 10 करोड डोस तयार करेल.

No comments