धक्कादायक । दूध डेअरीच्या मालकासह अकरा कामगार कोरोना पॉझिटिव्ह

Eleven workers corona positive, including the owner of the milk dairy
हडपसर येथील एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
मागील चार दिवसांपासून संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांना करोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांची तपासणी करण्यात अली होती. त्याला करोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आल्याने डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला असून ११ जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या डेअरीमधून जवळील सोसायटीच्या ज्या नागरिकांनी दूध, लस्सी ,समोसे व स्वीटचे पदार्थ खरेदी केलेले आहे, त्या सर्वांची महापालिकेच्या पथकाकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू करण्यात आलं आहे. 
लॉकडाऊनच्या काळात देखील ही डेअरी सुरू होती. या डेअरीतून अनेक ठिकाणच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व स्वीट अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या डेअरीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क आलेल्या नागरिकांची शोध घेणं हे महापालिकापुढचं मोठं आव्हान आहे. डेअरी मालकासह ११ जणांना करोना झाल्याच्या वृत्तास हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांनी दुजोरा दिला आहे. 

No comments