आज सकाळपर्यंत माळशिरस तालुक्यात दोनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य विभागाची माहिती

Till this morning only two corona positive patients in Malshiras taluka, health department information
आज दि. २९ मे रोजी सकाळी साडेआठ पर्यंत माळशिरस तालुक्यात फक्त दोनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागाने दिलेली माहिती
🟣आरोग्य विभाग माळशिरस
🔅COVID19 UPDATES🔅
दिनांक:-29/5/2020

 *माळशिरस तालुक्यात आत्तापर्यंत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.*

तालुक्यात आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. संपर्कातील दहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .संपर्कातील अजून सहा व्यक्तीचे अहवाल अप्राप्त आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत . तालुक्यातील रुग्णांचा संपर्क पण अनेक ठिकाणी आल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे . त्यामुळे सर्वांनी अति सतर्क रहावे. घरीच थांबावे. प्रशासनाचे सर्व नियम पाळावेत .प्रत्येकांचे फोन उचलणे आणि उत्तर देणे अवघड आहे. आम्हाला अधिकृत माहिती मिळताच आम्ही ती कळवत राहु. सहकार्य करावे ही विनंती.

डॉ .रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस.🟣

No comments