महाराष्ट्र अन् गुजरातवर ‘हिका’ वादळाच्या धोक्याचं सावट,

Hika threatens Maharashtra and Gujarat

कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या गुजरातवर आता चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी अरबी समुद्रासाठी दुहेरी दबाच्या पट्ट्याचा अलर्ट जारी केला आहे. भारतात सायक्लॉन मॅन म्हणून प्रसिद्ध, चक्रीवादळाच्या अंदाजाचे तज्ज्ञ मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले की, दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, आम्हाला वाटते की सोमवारी तो डिप्रेशनमध्ये परावर्तीत होईल आणि परवा तो चक्रीवादळात रूपांतरित होईल. तर 3 जूनच्या सायंकाळीपर्यंत हे वादळ गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनार्‍यांपर्यंत पोहचेल. या वादळाचे नाव ’हिका’ आहे, त्याचे नामकरण मालदीवने केले आहे.



अरबी समुद्रात सक्रिय 2 वादळं

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी एका खासगी एजन्सीने चक्रीवादळाची शक्यता वर्तवली होती, परंतु हवामान विभागाकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सिस्टम वेस्ट सेंट्रल आणि साऊथ वेस्टवर तयार होत आहे, जी 48 तासानंतर डिप्रेशनमध्ये बदलू शकते आणि चक्रिवादळाचे रूप धारण करू शकते आणि असे झाले तर सौराष्ट्र आणि साऊथ गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो.


No comments