धक्कादायक । तरुणाचा दगडाने ठेचून खून

'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहताना बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अक्षय गागोदेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. इंद्रजीत गायकवाड याच्या बहिणीसोबत तो धानोरी येथे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होता. अक्षय आपल्या बहिणीला त्रास देत असल्याची तक्रार इंद्रजीतच्या कानावर आली होती. तो राग मनातून धरून इंद्रजीतनं काही साथीदारांसह रविवारी रात्री अक्षयवर हल्ला चढवला. त्याला दगडांनी मारहाण केली. या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अक्षयला वाचवण्यासाठी आलेला त्याचा मित्रही हल्ल्यात जखमी झाला आहे.
No comments