भरधाव ट्रकची चेकपोस्टला धडक; कर्तव्यावरील शिक्षक गंभीर जखमी

Load truck hits checkpost;  Teacher on duty seriously injured

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील जिल्हा नाकाबंदी कर्तव्यावर असलेले शिक्षक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. चेकपोस्टवर त्यांची ड्युटी असतानाचा महामार्गावरून भरधाव आलले ट्रक थेट नाकाबंदीनजीक असलेल्या तंबूत शिरला. या घटनेत वावी (ता. सिन्नर) येथील शिक्षक सुनील बबनराव डुकरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. सीमाभागात ग्रामीण पोलिसांनी चेकपोस्ट उभारल्या असून याठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. अपुऱ्या पोलिसांच्या मनुष्यबळामुळे काही शिक्षकांना याठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे.

No comments