ऑनलाइन काव्य वाचन स्पर्धा संपन्न, सुमारे १०० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग
माळशिरस येथील ब्रिलियंट चेस अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये काव्य, साहित्य, काव्यरसास्वाद यांची अभिरुची निर्माण व्हावी म्हणून अकॅडमी चे संस्थापक श्री. अभिजित बावळे यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील पुणे, शिरूर, सांगली, मुंबई, यवतमाळ, सांगली, नाशिक, अकलूज, येथील 100 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता .
स्पर्धेतील *पूर्व प्राथमिक गटात* प्रथम - कु. अनन्या बाळापुरे (उघडेवाडी, वेळापूर), द्वितीय- कु.शिवज्ञा जाधव(डोंबालवाडी), तर तृतीय- कु. अनुष्का धांगेकर (पन्हाळा, कोल्हापूर) यांनी क्रमांक पटकावले,
*माध्यमिक गटात* प्रथम क्रमांक विभागून कु. नम्रता चोरडिया (शिरूर,पुणे) आणि श्रावणी नानकर (औरंगाबाद) यांनी तर द्वितीय क्रमांक विभागून कु. सरिस्का बावळे (माळशिरस) आणि कु. प्राप्नोती नेवरेकर (मालिनगर), आणि तृतीय क्रमांक चि. सिद्धराज कुसुमडे यांनी पटकावला .
*महाविद्यालयीन गटात* प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर तनपुरे , द्वितीय क्रमांक विभागून चि. ऋतुराज जगताप ( सिन्नर, नाशिक) आणि अजिंक्य क्षीरसागर (बार्शी) तर तृतीय क्रमांक कु. वैष्णवी जाधव (सांगली ) यांनी पटकावला .
सदर स्पर्धेसाठी श्रीमती कुंदबाला नेवरेकर यांनी काम पाहिले तर श्री. जंबूकुमार दोशी, श्री. स्वप्नील शहा आणि एस टी राऊत सर यांनी बक्षीस रकमेचे सहकार्य केले .
No comments