धक्कादायक । बोरगाव येथील एकुलत्या एक मुलाचा झाला बुडून मृत्यू, पोहणे बेतले जीवावर

Solapur-malshiras-borgaon-Young-man-drowned

बोरगाव (ता.माळशिरस) येथील दत्तू रामचंद्र मांजरे वय 25 हा मित्रांबरोबर दुपारी दोनच्या सुमारास कृष्णात खटके बोरगाव यांच्या विहिरीवरती पोहायला गेला होता. पोहत असताना पाण्यात त्याचा दम सुटल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाला.  उजनी कॅनॉल गच्च भरून वाहत आहे.  कॅनॉलच्या बाजूला असलेल्या विहिरी पाणी जिरफल्याने  परकुलेशन होऊन गच्च भरलेल्या आहेत, त्यामध्ये दत्तू मांजरे व त्याचे सात-आठ मित्र गेले आठ दिवसापासून रोज दुपारी पोहायला जात होते.  आज दुपारी पोहत असताना दत्तू मांजरे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.  सदर विहीर २५ फूट खोल आहे.  त्यामध्ये 22 फूट पाणी आहे. दत्तू मांजरे याला आई, वडील व तीन लग्न झालेल्या बहिणी असा  परिवार आहे.  तो सोलापूर येथील गोकुळ कारखान्यात कामाला होता. लॉकडाऊन झाल्यामुळे तो आपल्या बोरगाव गावी आला होता.  वडील शेळ्या राखण्यासाठी गेले होते.  ही बातमी त्यांना कळताच त्यांना अश्रू अनावर झाले. पोलीस ए  एस आय पानसरे, समाधान देशमुख, खराडे घटनास्थळी पोचले असून पंचनामा केला आहे. पोस्टमार्टम साठी बॉडी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठवली आहे.

“सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. कॅनॉल अथवा विहिरीला कुणीही पोहायला जाऊ नये, कामा शिवाय  बाहेर फिरू नये. असे निदर्शनास आल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जातील.”- एपीआय, सुधीर तोरडमल, श्रीपूर आउट पोस्ट पोलीस स्टेशन

No comments