दिलासादायक । माळशिरस तालुक्यातील त्या 16 जणांचा अहवाल निगेटिव्ह, दोन रुग्णांवर उपचार सुरू
![]() |
संग्रहित छायाचित्र । सविस्तर बातमी खाली |
माळशिरस तालुक्यात सुरवातीला सापडलेल्या पॉझिटिव्ह दोन रुग्णांच्या संपर्कातील सोळा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही बातमी तालुक्याला दिलासादायक ठरणारी आहे. मात्र तरीही त्या दोन व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचे तपासणी व ड्आरोग्य विभागाकडून सुरू आहे. तसेच आजही काही व्तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे याबाबत आरोग्य विभागाने खुलासा केला आहे.
■ आरोग्य विभागाचा मेसेज
🟣आरोग्य विभाग माळशिरस
🔅COVID19 UPDATES🔅
दिनांक:-30/5/2020
*माळशिरस तालुक्यात आत्तापर्यंत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.*
तालुक्यात आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत एकूण दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. संपर्कातील 16 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . संपर्कातील अजून काही व्यक्ती शोधण्याचे काम सुरू आहे .त्यांची तपासणीही सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत . तालुक्यातील रुग्णांचा संपर्क पण अनेक ठिकाणी आल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे. तसेच अजून काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. आज काही स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत .त्यामुळे सर्वांनी अति सतर्क रहावे. घरीच थांबावे. प्रशासनाचे सर्व नियम पाळावेत. सहकार्य करावे ही विनंती.
डॉ .रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस.🟣
No comments