पॅरोलवर सुटलेल्या तरुणाचा काही तासांत झाला खून

Pune-yerwada-murder पॅरोलवर सुटलेल्या तरुणाचा काही तासांत झाला खून
येरवडा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर पडलेल्या आरोपीचा काही तासांतच एका टोळक्याने तीक्ष्ण हत्यारांनी वार करून  निर्घृण खून केला. येरवडा येथील शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नितीन शिवाजी कसबे (वय 22) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पुण्यातील खुनाचे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाही. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

येरवडा पोलिसांनी याप्रकरणी 16 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आकाश कनचिले, आकाश सपकाळ, आकाश मिरे, गणेश आडसूळ, निखिल कांबळे, चेतन भालेराव, ओंकार, सोनवणी आदी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

No comments