लाच घेणारे दोन पोलीस बडतर्फ, पोलीस खात्यात खळबळ
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस जमादारास अखेर सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २५ मे रोजी काढले आहेत. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील तक्रारदाराकडून लाच स्वीकारणारा जमादार नंदकिशोर मस्के यास बडतर्फ केले तर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके हे बेजबाबदारपणे वागत असल्याने तसेच कोरोना सारख्या महामारीत कर्तव्यात निष्काळजीपणा करत असल्याने त्यांनाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे मात्र पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
No comments