भाजपच्या संकुचित वृत्तीच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून दणका, महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग ट्रेंड - विकास वाघे




कोरोना सारख्या गंभीर संकटाच्या वेळी विरोधी पक्षाने सरकार सोबत राहून काम करण्याची गरज असताना उलट भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेऊन राज्यात सरकार कसे अस्थिर करता येईल आणि आपण पुन्हा सत्तेत कसे येऊ यामागे पळताना दिसत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपने मेरा अंगण मेरा रणांगण या नावाखाली आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन म्हणजे कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या सर्वांचा अपमान करण्यासारखे असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले होते व भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून #महाराष्ट्रद्रोहीBJP ही मोहीम महाविकास आघाडी करून चालवण्यात आली आणि बघता बघता ही मोहीम भाजपच्या अंगलट येऊन देशात एक नंबरला ट्रेंड झाली.

सध्या कोरोनाच्या संकटाला डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलिस, सफाई कामगार, यांच्यासह अनेक जण ताकदीने तोंड देत आहेत परंतु भाजप आख्या वेळी राजकारण करण्यात व्यस्त आहे. आजच्या आंदोलनात प्रामुख्याने भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने भाजपला इतर राज्यातील कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागल्याचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेलचे   विकास वाघे यांनी सांगितले.
तसेच जर राज्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असतील तर देशातील परिस्थितीला पंतप्रधान जबाबदार असतील त्यामुळे भाजपचे नेते त्यांचा राजीनामा मागणार का? असा प्रतिप्रश्न विकास वाघे यांनी भाजपला केला आहे.

No comments