प्रेमप्रकरणातून २५ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून जिवंत पेटवले
उत्तर प्रदेशमधील फतनपूर भागातील भुजौनी गावात सोमवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार अंबिका या व्यक्तीचे महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध होते. जमावाने तरूणाला जिवंत जाळल्यानंतर भुजौनी गावात मोठी हिंसा घडली. तब्बल तीन तास जमावाने गोंधळ घातला होता. तरुणाच्या हत्येमुळे भडकलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. पोलिस आधिकाऱ्यासमोर जमावाने पाच गाड्या जाळल्या त्यात दोन पोलिस गाड्यााचा समावेश होता. या हिंसाचारात घटनास्थळावर उपस्थित असणारे चार पोलीस जखमी झाले. पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, अंबिकाला झाडाला बांधून जाळण्यात आले होते. त्याची हत्या प्रेयसीच्या नातेवाइकांनीच केली असावी असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. अंबिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
No comments