सोलापूर । जिल्ह्यात बनावट खते बनविणारी टोळी गजाआड

Solapur-Gang-making-fake-fertilizers-in-the district-is-arrested
बनावट खते बनवून शेतकऱ्यांची फसवणूक करणारी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 
झुआरी ऍग्रो कंपनीचे असणारे पोटॅश हे बनावट बनवून माढा आणि करमाळा तालुक्यात ही टोळी खते विकत होती. करमाळा तालुक्यातील खत दुकानदार निलेश खानोरे यांच्या दुकानावर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या पथकाने त्यांचेकडे आलेल्या तक्रारीनुसार धाड टाकली यावेळी हा साठा समोर आला आहे. 
याबाबत अधिक चौकशी केली असता ही बनावट खते मोहन सुतार (रा.भांगे ता.कागल जि.कोल्हापूर) येथून अक्षय काशीद (रा.कन्हेरगाव ता.माढा जि.सोलापूर) यांना व तेथून (वाशिंबे ता.करमाळा) येथील मिलींद खानोरे या खत दुकानदाराकडे विक्रीसाठी आलेली होती.
याप्रकरणी जिल्हा कृषी कार्यालयाचे अधिकारी यांनी करमाळा पोलिसांत या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


No comments