सांगोला । भीषण अपघातात सात वर्षीय मुलगा जागीच ठार
सांगोला तालुक्यातील सोनंद येथे झालेल्या मोटारसायकल व आयशार ट्रकच्या भीषण अपघात बेळुंखी, जत येथील तीन जण जखमी तर सात वर्षीय मुलगा जागीच ठार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,
बेळुंखी येथील भाऊसाहेब चव्हाण, पत्नी रुपाली, मुलगा ओम व शिवम असे सर्वजण सांगोला तालुक्यातील कडलास येथे देवदर्शनासाठी आले होते. शनिवारी पहाटे पाच च्या सुमारास मोटारसायकल वरून आपल्या गावी बेळुंखी येथे जाताना हा अपघात सोनंद, सांगोला येथे बस स्थानकसमोर घडला यामध्ये
शिवम भाऊसाहेब चव्हाण, वय - ०७ वर्षे हा जागीच ठार झाला आहे तर तिघे जखमी झाले आहेत. सुदैवाने चार वर्ष वयाचा ओम हा या अपघातात बचावला.
पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
No comments