येत्या 48 तासांत वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचा इशारा

Mansoon
निसर्ग चक्रीवादळाच्या झटक्यातून आपण वाचून दोनच दिवस झाले असताना हवामान खात्याने पुन्हा एकदा येत्या 48 तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. 
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याने म्हंटल आहे. 
दक्षिण पश्चिम मान्सून हा भारतामध्ये सक्रिय झाल्याने देशभर पाऊस पडेल असं राष्ट्रीय हवामान खात्याचा अंदाज आहे.
दोन दिवसांत मान्सून पश्चिम भारतात वेगाने प्रवेश करणार असून 11 जूनला मुंबईत मान्सून हजेरी लावेल असेही अंदाज वर्तविण्यात येत आहेत. 


No comments