संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
वेळापूर येथे संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. निमगाव रोड नजीक श्री.रामचंद्र आडत यांचे घरी कीर्तन,भजन,महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी आनंदमूर्ती भजनी मंडळाने भजन,कीर्तन केले.यानंतर १२ वाजता संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचे फोटोवरती पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती झालेनंतर सर्वाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच नंदाबाई वाघे, विश्वास वाघे,पांडुरंग आण्णा मंडले, सावकार वाघमोडे, चंद्रकांत बनकर, विष्णू कुदळे, दीपक आबा राऊत, पत्रकार ठोंबरे, नाळे, आडत,राऊत,बनकर,वाघे,पिसे,म्हेत्रे,कुदळे,काकुळे,मोहिते,देशपांडे,माने,आदी उपस्थित होते.
No comments