लोकविकास शिक्षण संस्थेस मिळाला बोर्ड सांकेतांक
वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
नेचर पॉईंट,वेळापूर येथील लोकविकास शिक्षण प्रसारक संस्था वेळापूर या संस्थेस नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून बोर्ड परीक्षेसाठी आवश्यक असणारा बोर्ड सांकेतिक क्रमांक मिळाला.
या संस्थेत इंग्रजी व मराठी माध्यमाचे पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून इ.१० वी १२ वी ची पहिली बॅच मार्च २०१७ मध्ये होणार्या परीक्षेसाठी बसणार आहे.यासाठी आवश्यक असणारा बोर्ड सांकेतिक क्रमांक मिळाला असून विद्यार्थी स.म.शं.मोहिते पाटिल विद्यालय वेळापूर या केंद्रावर परीक्षेसाठी बसणार आहेत.
हा क्रमांक मिळालेने पालकामध्ये असणारा संभ्रम दूर झाला असलेचे संस्था अध्यक्षा वैशाली बनकर यांनी 'वेळापूर लाइव्ह' शी बोलताना सांगितले.
No comments