आरेवाडीला जाणार पन्नास हजार धनगर बांधव
महाराष्ट्राच्या कनाकोपर्यात पसरलेला दोन कोटी धनगर समाज प्रथमच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने बिरोबाबन आरेवाडी (ता.कावठेमहाकाळ, जि.सांगली) येथे ७ ऑक्टोबर रोजी संघटीत होत आहे. या मेळाव्यासाठी महुद परिसरात जय्यत तयारी चालू असून सुमारे पन्नास हजार धनगर समाज बांधव जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारा धनगर समाज संघटित नसल्यामुळे समाजाची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक पिछेहाट झालेली आहे. हक्काचे सांविधानिक अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यापासून समाज वंचित आहे. समाजाच्या ज्वलंत प्रश्नांची चर्चा या मेळाव्यात व्हावी या चर्चामधुन योग्य दिशा घेवून पुढील लढाईची योजना आखण्याच्या दृष्टीने समाजाने या महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
धनगर समाजाचा प्रथमच ऐतिहासिक दसरा महामेळावा होत असल्यामुळे समाजबांधवामध्ये मोठा उत्साह आहे. महुद परिसरातील गावामध्ये धनगर समाज मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य करतो. प्रत्येक समाजबांधव हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आपल्या स्थानी मेहनत घेत आहे. मेळावा ऐतिहासिक बनवण्यासाठी तन-मन-धन सर्मपित भावनेतून परिश्रम घेत आहे. समाजातील गट-तट ,पक्ष-पार्टी, संघटना, वैयक्तिक मतभेत, विसरून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बिरोबाच्या पवित्र भूमिमध्ये बिरोबाला नतमस्तक होण्यासाठी व इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी महुद परिसरातून पन्नास हजार धनगर समाज बांधव या मेळाव्यास जाणार आहेत.
खुप मस्त
ReplyDelete