वनपरिक्षेत्राची जागा गोरगरिबांना मिळावी : दलित महासंघाने दिले प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
वेळापूर लाइव्ह टीम | अकलूजदलित महासंघाचे वतीने माळशिरस तालुक्यातील शासनाच्या शासकीय वनपरिक्षेत्रातील जमीनीवर अनेक वर्षांपासून वास्तव करीत असलेल्या गोरगरीब, उपेक्षित, वंचित कुटुंबाला राहणे करीता हक्काची जागा उपलब्ध करून देणे करीता मा.उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या वनपरिक्षेत्रातील जागेवर गेली अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणारी गोरगरीब, उपेक्षित, वंचित कुटुंबे रहात आहेत. आशी कुटुंबे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. सदर कुटुंबांची परिस्थिती हालाकीची असल्याने अनेक वर्षांपासून ते शासनाच्या जमीनीवर वास्तव्यास आहेत. त्यामुळे या कुटुंबाला शासनाच्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आशा कुटुंबाला जागे अभावी घरकुल, शौचालय या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आशा दुर्बल घटकांना अनेक योजना पासून वंचित राहावे लागत आहे. तरी शासनाने आशा जागेवरती रहात असलेल्या कुटुंबाला त्यांना हक्काची जागा देवून त्यांचे पुनर्वसन करावे व सदर ठिकाणी वास्तव करीत असलेल्या जागे मधील किमान दोन गुंठे जागा त्यांच्या नावे करून देण्यात यावी जेणेकरून त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येईल व त्यांना आपली हक्काची पक्की घरे बांधता येतील व त्यांना कोणत्याही भीतीच्या सावटाखाली रहावे लागणार नाही.
तरी शासनाने व संबंधित विभागाने या बाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा व सदर कुटुंबाला हक्काची जागा उपलब्ध देण्यात यावी अन्यथा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा महिला आघाडीच्या नगमाताई शिवपालक यांच्या नेतृत्वाखालील दिनांक १२/०६/२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सदर बाबतचे निवेदन प्रांत अधिकारी शमा पवार यांनी स्वीकारले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा म.आघाडी नगमाताई शिवपालक, जिल्हा उपाध्यक्ष सतिश महापुरे , जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी मारूती नाईकनवरे , जिल्हा मार्गदर्शक महादेव शिवपालक, तालुका कार्याध्यक्ष अजय साठे , शहराध्यक्ष चैतन्य कांबळे, युवराज कुचेकर, विष्णु कुचेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments