बचेरी येथे आग लागून लाखों रुपयांचे नुकसान
बचेरी
येथील तनिष्का पेपर उद्योगाला शॉर्ट सर्किटने लागली आग !
वारीच्या तोंडावर मोठे नुकसान
वेळापूर लाईव्ह न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील विकास नामदेव पिसे यांच्या तनिष्का पेपर उद्योगाच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे काल (गुरुवारी) रात्री ०१ च्या सुमारास आग लागून गोदामातील लाखो रुपये किमतीचे पत्रावळ्या,द्रोण,चहाचे कप व गोदामातील इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या आषाढी वारीचा हंगाम असल्याने पत्रावळ्या,द्रोण व कप यांच्या मोठ्या प्रमाणात खप होतो म्हणून गोदामामध्ये इतरवेळे पेक्षा मोठ्या संख्येने स्टॉक करुन ठेवला होता. गोदामातील काम आटपून विकास नामदेव पिसे त्यांचे वडील नामदेव पिसे व कर्मचारी झोपी गेले असता नामदेव पिसे हे लघूशंकेसाठी उठले असता त्यांना गोदामातून धूर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी आरडा-ओरडा करुन घरातील सर्व सदस्यांना व कर्मचाऱ्यांना झोपीतून उठवले व सब स्टेशनला वीज पुरवठा खांडीत करायला लावला त्यानंतर कर्मचारी,कुटुंबातील सदस्य व शेजारी यांच्या मदतीने एस.टी.पी च्या व मोटारीच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु गोदामामध्ये केमिकल मिश्रित चमकिच्या कागदाचे मोठे रिल असल्याने आग आटोक्यात आली नाही त्यामुळे गोदामातील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या. पिलीव पोलिस व विज वितरण कंपनी यांनी घटनास्थळाला भेट दिली परंतु संबंधित आसणार्या महसुल खात्याच्या अधिकार्याने उशीरा पर्यंत भेट दिली नसून सायंकाळी 6 पर्यंत तरी पंचनामा झालेला नव्हता.
#चौकट :- विकास पिसे हे सुशिक्षित बेकार तरुण असून त्यांना तनिष्का पेपर उद्योगासाठी विविध बँकाकडून कर्ज घेवून हा उद्योग सुरु केला होता परंतु या जळीत कांडामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून त्याला पुन्हां उद्योग उभारणीसाठी शासकीय आर्थिक मदतीची गरज आहे.

No comments