श्रीमंत बनकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान , सोलापूर प्रमाणपत्र केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१८ - १९ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये स्वयंसहाय्यता समुहांनी केलेल्या विविध उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी समुहांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले . याकरिता श्रीमंत बनकर ता . माळशिरस पत्रकार , दैनिक पुण्यनगरी यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान , सोलापूर यांच्या वतीने त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन दि . १७ / ०२ / २०२० रोजी गौरविण्यात आले आहे. 
सोलापूर येथे प्रशासनाकडून उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ जिल्हाअभियान व्यवस्थापक मिनाक्षी मडवळी प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण सभापती विजय डोंगरे स्वाती शटगार वसंत नाना देशमुख व इतर मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला. 

No comments