आयबी कर्मचाऱ्याची हत्या; आप नेत्याची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी
ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीत एका आयबी कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात कर्मचाऱ्याची भोसकून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी आपचे नेते ताहिर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची आपमधून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सीएए विरोधक व समर्थक आमने सामने आले होते.
No comments