चुकीची औषधे देणा-या दोन बोगस डॉक्टरांना अटक
डॉक्टरकीचे बनावट प्रमाणपत्र दाखवून बोगस दवाखाना सुरु केला. तसेच दवाखान्यात येणा-या रुग्णांना चुकीची औषधे दिली. हा प्रकार भोसरी येथे सफलता आयुर्वेदिक दवाखान्यात सुरु होता. याप्रकरणी दोन बोगस डॉक्टरांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. अहमद इम्तियाज शेख (वय 32, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे), डॉ. मोनी मोहन सुधीर सिन्हा (वय 55, रा. भोसरी. मूळ रा. श्रीकृष्णपूर, जीबनताला, कारखाना चौक, साऊथ चौबीस परघना, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी अभय चंद्रकांत पवार (वय 47, रा. बेलापूर, नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
No comments