मराठी राजभाषा दिनानिमित्त अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयात काव्यवाचन





शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथे मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रजांची जयंती अर्थात मराठी राजभाषा दिना निमित्त काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी व अनेक विद्यार्थांनी काव्य वाचन केले. महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. नानासाहेब वरकड, इतिहास विभागातील प्रा. अभिजीत घाडगे, प्रा. रविंद्र माने, प्रा. गोरख मंगवडे, प्रा. आश्या गायकवाड यांनी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दादासाहेब साठे यांनी कवी कुसुमाग्रज, कवी नारायण सुर्वे, विंदा करंदीकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या कविता वाचल्या. विद्यार्थांमध्ये लक्ष्मी भोसले, प्रगती नाईकनवरे, कांचन बिराजदार, शहाजी मंडले यांनी कविता वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अभिजीत घाडगे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आशा गायकवाड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. मनोज नांगरे यांनी मानले.

No comments