शिवजयंती । दिल्लीत झाला दिमाखदार सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम आणि मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीचा आसमंत दुमदुमला. उत्साहाने ओतप्रोत या वातावरणाचे साक्षीदार झालेल्या 10 देशांच्या राजदुतांनाही या सोहळ्याने भुरळ घातल्याचे चित्र दिसून आले. महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. सोहळ्यात पोलंड, बल्गेरिया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस आणि इस्रायल या 10 देशांच्या राजदुतांनी सहभाग घेतला होता.
No comments