महाराष्ट्र स्टार्टअप विक मध्ये सामील व्हा
राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे राज्यातील तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी एप्रिलमध्ये ‘महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. सप्ताहामध्ये सहभागी झालेल्या शासकीय कामाशी किंवा गरजांशी संबंधीत असलेल्या निवडक 24 स्टार्टअपना प्रत्येकी 15 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील आणि विशेषत: ग्रामीण भागातील स्टार्टअपनी सप्ताहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments