कोरोना विषाणू : राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षाची स्थापना



३६१ खाटांची उपलब्धता - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. 


राज्यात ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ खाटा उपलब्ध आहेत. सध्या राज्यात चार जण निरीक्षणाखाली असून प्रत्येकी २ जण मुंबई आणि पुणे येथे भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

No comments