शिवरायांचा अपमान करणार्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवक पद ठाकरे सरकार कडून रद्द करण्यात आले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारने श्रीपाद छिंदम याला दणका देत त्याचे नगरसेवक पदच रद्द केले आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून तो निवडून आला होता. त्यानंतर त्याने नगर तहसील कार्यालयात येऊन बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने त्याचे पद रद्द झाले पाहिजे यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी गुरुवारी (27 फेब्रुवारीला) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात होणार होती.
No comments