पानिव । प्रकाश पाटील यांच्या शेतातील कडबा गेला चोरीला

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या शेतातील कडबा चोरीला गेल्याची घटना घडली असून याबाबत वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत त्यांचे शेतातील कामगार बाळासाहेब बळवंत बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, 
खुडुस ता.माळशिरस हदद्ीत वसंत रामचंद्र तोरणे ,हनुमंत रामचंद्र तोरणे व प्रकाश शामराव पाटील रा.पानीव ता.माळशिरस यांची शेती गट नंबर 326 मध्ये साडेपाच एकर शेती असुन त्यामध्ये सध्या ज्वारीचे पिक आहे.सदर शेतात बाबर हे एक वर्षापासुन मजुरीने कामास आहे.माझे प्रमाणेच प्रकाश पाटील यांचेकडे लक्ष्मण रामा खवळे,गोरख शामराव शिंदे दोघे रा.पानीव ता.माळशिरस असे कामगार आहेत.
गेले 15 दिवसापुर्वी खुडूस ता.माळशिरस शेती गट नंबर 326 मधील ज्वारी,मी,लक्ष्मण खवळे,गोरख शिंदे,बाळु बाबर,नाथा साठे,भिमराव गायकवाड सर्व रा.पानीव ता.माळशिरस यांनी काढुन त्याची कणसे खुडून काढुन काढलेली होती व त्यानंतर सदर कडब्याचे जागीच डेपो लावण्याचे काम चालु होते.दि.2/3/2020 रोजी सायंकाळी 05.30 वा.पर्यंत आम्ही शेतात कडबा गोळा करण्याचे काम करून आम्ही आमचे घरी गेलो.दि.3/3/2020 रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास मी,गोरख शिंदे,लक्ष्मण खवळे,नाथा साठे,भिमराव गायकवाड असे आम्ही खुडूस ता.माळशिरस शेती गट नंबर 326 मधील कडबा गोळा करून डेपो लावत असताना म्हसोबा जवळील 100 पेंढया कडब्याचा डेपो आम्हांस दिसुन आला नाही.तेव्हा सदर प्रकार मी आमचे मालक प्रकाश पाटील यांना सांगीतला.त्यानंतर मी,गोरख शिंदे,लक्ष्मण खवळे अशांनी आमचे शेताचे आसपास दोन दिवस कडब्याचा शोध घेतला परंतु कडबा मिळुन आला नाही.सदरचा कडबा कोणी तरी चोरून नेला असल्याची आमची खात्री झाली परंतु सदर कडबा कोणी चोरून नेला या बाबत मला माहिती नाही.तेव्हा मालकांनी आम्हांस कडबा चोरी बाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगीतले म्हणुन मी आज रोजी तक्रार देण्यास आलेलो आहे.
आमचे चोरीस गेलेले कडब्याचे वर्णण खालील प्रमाणे 
1) 2,000/-एकुण 100 पेंढया कडबा प्रत्येक पेंढीची किंमत 10 रूपये असलेली कडबा नविन 
---------    असलेला कि.अ.
 2,000/- येणे प्रमाणे वरिल वर्णनाचा व किमतीचा कडबा चोरीस गेलेली आहे.
तरी दि.2/3/2020 रोजी सायंकाळी 05.30 ते दि.3/3/2020 रोजी सकाळी 10.30 वा.दरम्यान आमचे मालक वसंत रामचंद्र तोरणे ,हनुमंत रामचंद्र तोरणे,प्रकाश शामराव पाटील यांचे खुडूस ता.माळशिरस शेती गट नंबर 326 मधील 100 पेंढी कडबा 2,000/-रूपये किंमतीचा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला म्हणुन माझी अज्ञात चोरटया विरूध्द फिर्याद आहे.
यावरून पोलिसांत भारतीय दंड संहिता १८६० चे ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments