अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जगातील सर्वात जास्त हानी अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत 29 फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला बळी गेला. आणि त्यानंतर अवघ्या 88 दिवसांत अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा तब्बल एक लाखांच्या पुढे गेला आहे.
जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 17 लाख13 हजार 654 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांपैकी 30.47 टक्के कोरोनाबाधित हे एकट्या अमेरिकेत आहेत. त्यापैकी 4 लाख 68 हजार 778 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी एक लाख 64 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत अजून 11 लाख 44 हजार 812 इतके सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
Post Comment
No comments