महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या गुरसाळे येथील रक्तदान शिबिरात 111 रक्तदात्यांचा सहभाग


धर्मवीर छत्रपती संभाजीराजे  भोसले यांचे जयंतीच्या निमित्ताने  महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना शाखा गुरसाळे यांनी आयोजीत केलेल्या  रक्तदान शिबिरात 111 रक्तदान करणेत आले कोरोना व्हायरसने देशात व राज्यात थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे शाळा महाविद्यालयाला सुट्टी असलेने सगळीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी स्वःता रक्तदान करून जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केलं होते. या आव्हानास अनुसरून जनसेवा  संघटनेचे 2000 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून  या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभागी व्हायचे ठरवले असुन याच अनुशंगाने  गुरसाळे येथे आज 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबीरासाठी शिवराय प्रतिष्ठान गुरसाळे शिवजन्मोउत्सव समिती गुरसाळे व गुरसाळे ग्रामस्थांनी  सहभाग घेतला.

No comments