अनंत खंडागळे यांच्याकडून कोराना समितीला 500 तेलाचे पुडे


महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात कोरोना 19 विषाणुच्या संसर्गाने उग्र रूप धारण केले आहे यामुळे सगळ्या भागत लाॅकडाऊन केले आहे महाराष्ट्र शासन या महारोगाला प्रतिबंध करणेसाठी वेगवेगळया यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करित आहे लाॅकडाऊन सुरू झालेपासून माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली अनेक गरीब कुटुंबाना मदत केली आहे त्यांनी धान्य बँकेची संकल्पना मांडली त्यास अनेक दात्यांनी आपआपल्या पद्धतीने धान्य दिले त्यातून गरिबांना उपाशी राहू नये म्हणून सर्व समितीचे कार्यकर्ते झटत आहे तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी केलेल्या अहवानानंतर 2014 चे अपक्ष उमेदवार अनंत खंडागळे यांनी सामजिक बांधिलकी जपत 500 तेलाचे 1 किलोचे पुडे आज पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व खुडूस चे माजी उपसरपंच ड्रा तुकाराम ठवरे यांचेकडे सुपूर्द केले अनंत खंडागळे हे पुण्यात असतानाही ते केलेल्या मदतीमुळे गरिबांना आधार मिळाला आहे.

No comments