घ्या ! आता देशाचं नाव बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Now a petition in the Supreme Court to change the name of the country
संविधानात सुधारणा करून देशाचं नाव बदला अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

 तुम्हाला माहिती असेल संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये  देशाच्या नावाच्या व्याख्येशी संबंधित  माहिती दिली आहे.
आता  यामध्ये बदल करून इंडियाच्या जागी भारत किंवा हिंदुस्तान शब्द वापरण्यात यावा, अशी मागणी याचिकेमध्ये  केली आहे. 

 इंडिया हे इंग्रजी नाव आहे मात्र ते हटवल्यानं राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल, तसेच  येणाऱ्या पिढ्यांवर भारत/हिंदुस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे अनुच्छेदात बदल करा इंडिया ऐवजी भारत किंवा हिंदुस्तान शब्द समाविष्ट करा, अशी मागणी याचिकेमध्ये  केली आहे.

तस सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार २ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार, तर पाहू मग निर्णय काय लागतो. 

No comments