स्वामीराज भिसे यांचे खासदार सुप्रिया ताईंनी केले कौतुक

वेळापूर चे रहिवासी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वामीराज सूर्यकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कोविड 19 वरती एक लघुपट तयार केला आहे. 
या लघुपटाचे खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे त्यानी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंट वरती हा लघुपट पोस्ट करत 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने एक लघुपट केला असून त्यात देशासाठी सकारात्मक होण्याचं आवाहन आहे.स्वामीराज भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओत भक्ती,अंकिता,आकांक्षा,प्रशांत,राहुल, प्रतिक व राधिका यांचा सहभाग आहे.अवश्य पहा. असे आवाहन ही त्यांनी केले आहे. 

No comments