सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई परचंडे शहीद

solapur-policeman-Martyr-in-corona


सोलापूर ग्रामीण येथील श्वान पथकात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर परचंडे हे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाण्यानंतर्गत मौजे वडकबाळ येथील नाकाबंदी पॉईटवर कर्तव्य बजावत असताना सदर ठिकाणी एक बोलोरो पिक अप वाहन अति वेगाने येताना दिसले. सदर वाहनास थांबविण्याचा इशारा केला असता, सदरचे वाहन हे न थांबता पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर परचंडे यांन गंभीर जखमी करून निघुन गेले. सहका-याने परचंडे यांना उपचारास्तव अश्विनी हॉस्पीटल येथे दाखल केले. उपचारा दरम्यान आज शनिवारी रामेश्वर गंगाधर परचंडे हे शहीद झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी व १ मुलगा आहे. शहीद रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्यावर रुपाभवानी मंदिर जवळील तुळजापूर रोड, सोलापूर येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येवुन त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडुन मानवंदना देण्यात आली आहे.
याघटनेसंदर्भात अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर, शंभुराजे देसाई, गृह राज्यमंत्री ग्रामीण, सतेज पाटील, गृह राज्यमंत्री शहर, यांनी व पोलीस महासंचालक, म.राज्य मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दुःख व्यक्त करून आदरांजली वाहिली आहे.
या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाणे येथे १४५/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास प्रभाकर शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण विभाग हे करीत आहेत.

No comments