सोलापूरमधील ‘रिलायन्स कर्करोग उपचार केंद्रा’त म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांतर्गत उपचार उपलब्ध


Cancer treatment at Reliance Hospital, Solapur

 ‘रिलायन्स हॉस्पिटल’चे कर्करोग उपचार केंद्र हे आता महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विमा योजनेतील ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य’ योजनांतर्गत (एमजेपीजेएवाय) कार्यरत झाले आहे. ‘रिलायन्स हॉस्पिटल’तर्फे ही घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध भागांत कर्करोगांवरील उपचारांसाठी केंद्रे स्थापन करून सर्व थरांतील व्यक्तींना अत्याधुनिक उपचार देण्याच्या ‘रिलायन्स हॉस्पिटल’च्या वचनबद्धतेची आता पूर्तता होईल. आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थींना या उपचारांचा प्रामुख्याने उपयोग होईल.  
‘कोविड-१९’च्या विरोधात सर्व जग व भारतही एकवटलेला असतानाच्या काळात ‘रिलायन्स हॉस्पिटल’तर्फे कर्करोग उपचारासाठी केंद्र सर्वांसाठी उपलब्ध होत असल्याची घोषणा करण्यात आली. ‘कोविड-19’वर मात करणे महत्त्वाचेच आहे, त्याचबरोबर कर्करोगासारख्या गंभीर आजारांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्करोगाच्या सर्व थरांतील रुग्णांना वेळेत उपचार मिळून या दुर्धर रोगावर मात करण्यात ‘रिलायन्स हॉस्पिटल’च्या केंद्रांची मोलाची मदत होणार आहे.
सोलापूरचे हे केंद्र ‘रेडिएशन’च्या प्रगत उपचारपद्धतींसाठीच्या ‘ट्रूबीम मेडिकल लिनीअर अॅक्सलेटर’ या अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहे. तसेच येथे निष्णात ‘रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट’, तंत्रज्ञ व परिचारिका पूर्णवेळ उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार विनाविलंब घेता येणार आहेत. 
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत ‘रिलायन्स हॉस्पिटल’च्या या केंद्राचा अंतर्भाव झाल्याने सोलापूरमधीलच नव्हे, तर जवळपासच्य़ा परिसरातील रुग्णांनाही कर्करोगावर आधुनिक उपचार घेता येणे शक्य होणार आहे. ‘रेडिएशन थेरपी’ व ‘केमोथेरपी’ यांचे उपचार रिलायन्स कर्करोग उपचार केंद्रात घेता येणार आहे. 
रिलायन्स कर्करोग उपचार केंद्र सोलापूरमध्ये सुरू झाल्यापासून येथे या परिसरातील १७०० हून अधिक रुग्णांवर ‘रेडिएशन थेरपी’ करण्यात आली आहे. सोलापूरच्या परिसरात कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी व त्यांना या रोगावरील आधुनिक उपचारपद्धतींची माहिती देण्यासाठी या केंद्रातर्फे कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन अनेकदा करण्यात आले, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनतेशी अनेकदा संवाद साधला. जन आरोग्य योजनेत सामील झाल्यामुळे या केंद्रामध्ये यापुढे आधुनिक उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत, लोकांना आरोग्यसेवा पुरविणाऱ्या नेटवर्कच्या माध्यमातून प्रगत व दर्जेदार वैद्यकीय सेवांची सुविधा देण्याचे उद्दीष्ट बाळगण्यात आले आहे. योजनेनुसार पात्र ठरणाऱ्या रुग्णांनी +91-82759 70619 या थेट दूरध्वनी क्रमांकावर अथवा शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत रुग्णालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments