TikTok सह 52 चिनी अॅप बंद करा, गुप्तचर संस्थेची केंद्र सरकारला शिफारस
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीनच्या TikTok सह 52 चिनी अॅप बंद करण्याची मागणी केली आहे. याआधी हे अप्लिकेशन बंद करण्याची मागणी देशातील अनेक राज्यांनी केली होती मात्र पहिल्यांदा गुप्तचर यंत्रणेने हि मागणी केली.
काय म्हणाली गुप्तचर यंत्रणा ?
भारतीय गुप्तचर यंत्रणांना म्हणाली सध्या सुरक्षेच्या दृष्टीने चिनी अॅप्स असुरक्षित आहेत. हे अॅप्स भारताबाहेर भव्य डेटा पाठवत आहेत यामुळे, भारतावर मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे असे गुप्तहेर यंत्रणांनी म्हटलं आहे. या अॅप मध्ये टिकटॉक अॅप झूम, यूसी ब्राउझर, शेअर इट, क्लीन मास्टर आणि झेंडर सारख्या ५२ अॅप्सचा समावेश आहे.
आता गुप्तचर एजन्सींनी दिलेल्या प्रस्तावाला राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे लवकरच TikTok सारख्या चायनीज अॅप्स वर देशात बंदी घालण्यात येणार आहे.
Post Comment
No comments