सांगोला । वाळूचोरांवर पोलिसांची कारवाई, वाहनासह 96 हजारांचा मुद्देमाल जप्त

Sangola Police action against sand thieves
चोरीची वाळू घेऊन जात असताना पोलिसांनी वाळू व टेम्पोसह 96 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची घटना दत्तनगर (सांगोला) येथे बुधवारी (ता. 3) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी,
 बुधवारी (ता. 3) पहाटे पोलिस पेट्रोलिंग करीत असताना  वाळु चोरी होत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख व पर्वते पाहणीसाठी गेले. यावेळी हिरव्या रंगाच्या टेम्पोमध्ये वाळू आढळून आली. तेथे गणेश अर्जुन गोडसे (रा. वासुद, ता. सांगोला) हा उपस्थित होता. पोलिसांनी गोडसे यास वाळू वाहतुकीचा परवाना आहे का विचारले असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अवैधरित्या चोरून वाळू वाहतूक करीत असताना 90 हजार रुपये किंमतीचा टेम्पो व 6सहा हजार रुपयेची वाळू असा 96 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. भा.द.वि.379 व पर्यावरण अधिनियम 9,5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

No comments